(रत्नागिरी)
रत्नागिरी मध्ये दोन जण jN -1कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दरम्यान कोरोनाचे सब व्हेरियंट jN1 झपाट्याने वाढत आहे. आज शासकीय रुग्णालयात सापडलेले हे दोन रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील असून एक कसोप येथील तर एक तोणदे येथील असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एक महिला व पुरुष असून यातील महिलेला डेंगू झाला होता. त्यानंतर तिला दवाखान्यात ऍडमिट केले शासकीय रुग्णालयात दाखल केल्यावर तिची कोविडची तपासणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आढळली. मात्र सविस्तर अहवाल आल्यावर सदर व्हेरीअट बाबत माहिती नेमकी माहिती मिळणार आहे.
लोकांनी कोविड jn 1 ची लक्षणे काही दिसलं तीव्रता वाटली नसली तरी शासकीय रुग्णालयात येऊन किंवा प्राथमिक रुग्णालयात येऊन त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
25 डिसेंबर पासून नंतर 7 जानेवारीपर्यंत याची तीव्रता वाढणार आहे. कोरोना jN –1 व्हेरियंटची भीती नसली तरी त्याची लक्षणे म्हणजे ताप, सर्दी आल्यास घसा खवखवणे घसा दुखणे,अशक्तपणा वाढणे या गोष्टी जाणवतात. यासाठी तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून वेळेवरच उपचार करणे गरजेचे आहे.