(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने कै. सागर बास्ते व कै. मधुकर सुर्वे (कर्ला) यांच्या स्मरणार्थ कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी रत्नागिरी आयोजित श्री जयभैरव चषक खुली लेदर बॉल टी२० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे नुकतेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पिच क्युरेटर मधू बोटले सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे व रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड, बाबा चव्हाण, अजित भाटकर उपस्थित होते. तसेच रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन कार्याध्यक्ष बाळू साळवी, सचिव बिपीन बंदरकर, उपाध्यक्ष दीपक देसाई, सदस्य रमेश कसबेकर, सुनील घोसाळकर लाल्या खातू, अमित लांजेकर, मनोहर गुरव, एडवोकेट सचिन थरवळ, महेंद्र सुर्वे, राजीव सावंत, दिनेश सावंत हे उपस्थित होते.
विजेता संघाला ३० हजार रोख रक्कम व चषक, उपविजेता संघाला २० हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात येईल. तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात येईल. या स्पर्धेचा अंतिम सामना १० एप्रिल २०२२ रोजी होणार आहे.