(रत्नागिरी)
जनावरांवर आलेल्या लंपी आजारामुळे शेतकरी भयभीत झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील मजगांव येथील शेतकरी संघटक मकबूल मुकादम यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कशाळकर यांच्याशी संपर्क साधला असता रत्नागिरीत लंपी आजारावर उपचार आणि लसीकरणा बाबत जनजागृती करुन जनावरांना योग्य उपचार करुन देण्याबाबत तयारी दर्शवली.
डाॅक्टर कशाळकर यांनी आपली टीम घेऊन जनावरांना लसीकरण मजगांव येथून करण्यास सुरुवात केली. या वेळी डाॅक्टर कशाळकर, प्रदर्शन, गोग्रे, मजगांवचे लोकाभिमुख सरपंच फय्याज मुकादम, मकबूल मुकादम, इरफान मुकादम आदी उपस्थित होते. जनावरांना तातडीने उपचार होऊ लागल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.