(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गुढीपाडवा आपल्या संस्कृतीतील महत्वाचा आणि मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली. या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते. पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री रामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले. यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला. ज्याला गुढी म्हणतात.
हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचे रत्नागिरीतही मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात स्वागत यात्रेचे नियोजन करण्यासाठी काल पतित पावन मंदिरात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, तरुण वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होता.