( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी ते वरवडे व्हाया गणपतीपुळे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या खिशातील पाकीट अज्ञाताने लांबविल्याचा प्रकार घडला आहे. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी बारा ते दोन या कालावधीत शहरातील रहाटाघर ते साळवी स्टॉप दरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शैलेंद्र गजानन कोलथरकर (वय ५४, रा. कीर्तीनगर, म्हाडा वसाहत, रत्नागिरी) हे गणपतीपुळे येथे जाण्या करिता रहाटाघर येथे वरवडे व्हाया गणपतीपुळे गाडीत बसले, साळवी स्टॉप दरम्यान कंडक्टरने तिकीट विचारले. त्यांनी खिशात हात घातला असता त्यांची खिशातील पॉकेट गायब झाल्याचे निदर्शनास आली. या प्रकरणी कोलथरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.