( दापोली / प्रतिनिधी )
दापोलीत रेशनिंगचे धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला नवानगर येथे आज सकाळी अपघात झाला. या अपघातात ट्रकच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. मागील चाक आणि पुढील चाक मातीमध्ये रूतल्याने सुदैवाने चालक बचावला.
सविस्तर वृत्त असे की, कैलास सावंत हा आपल्या ताब्यात ट्रकमधून 21 टन धान्य घेऊन दापोलीच्या दिशेने चालला होता. नवानगर येथे रस्त्यावर गाय आडवी आल्याने तिला वाचवण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक गटारात कलंडला. यामध्ये टेम्पोचे समोरील भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही .