(रत्नागिरी)
अज्ञात कारणातून विषप्राशन करणाऱ्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार धाकु विठ्ठल जांगळे (७० रा. निर्मल पॅराडाईज कारवांचीवाडी रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे त्यांच्या राहत्या घरी १९ मे २०२३ रोजी स. १० वाजता धाकु विठ्ठल जांगळे हे तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत बेशुध्द आढळून आले. त्यांना तशा अवस्थेत पाहताक्षणी पत्नी सुनिता यांनी शेजारील लोकांच्या मदतीने खासगी रुग्णवाहिकेने उपचारांकरिता दाखल केले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचेवर उपचार करण्यात येत होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आलेली आहे.