( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरीतून एक वकील बेपत्ता झाल्याची चर्चा गेली दोन दिवस रत्नागिरीत सुरू आहे. मात्र या बेपत्ता वकिलाचा अद्यापही धांगपत्ता लागलेला नाही. या बेपत्ता वकिलाच नाव आहे तेजस कोरगावकर. त्यांच्या नातेवाईकांनी तेजस बेपत्ता असल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून पोलिस तपास करत आहेत. बेपत्ता तेजस यांचा अजूनही सुगावा लागलेला नाही. शिवाय त्यांच्या गाडीचाही सुगावा लागलेला नाही. मात्र समाज माध्यमातून तेजस यांची गाडी बत्तीस शिराळा येथे सापडल्याचे वृत्त पसरवले जात होते, मात्र पोलिस तपासात ही अफवा असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार तेजस कोरगावकर कागल येथे सापडल्याचे रत्नागिरीत बोलले जात आहे. मात्र याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
रत्नागिरीतून 2 जानेवारीपासून अॅड. तेजस कोरगावकर हे बेपत्ता झाले. नातेवाईकांकडे शोध घेऊनही ते सापडत नसल्याने नातेवाईकांनी वकिल तेजस कोरगावकर बेपत्ता असल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली. तेजस यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढलेले असताना कोल्हापूर येथील त्यांच्या एटीएम मधून पैसे काढल्याचा सुगावा पोलिसाना लागला आहे. त्यामुळे तेजस नेमके कुठे आहेत? त्यांच्या एटीएमचा कोण वापर करत आहे का? आदी प्रश्न पोलिसाना पडले आहेत. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
समाज माध्यमातून तेजस यांची गाडी सांगली शिराळा येथे सापडल्याचे वृत्त पसरवले जात होते मात्र अद्यापही त्यांच्या गाडीचा तपास लागलेला नाही. तेजस यांची गाडी देखील नेमकी कुठे आहे याचा शोध सुरू आहे. मात्र गाडी सापडल्याच्या अफवा समाज माध्यमांवर पसरवल्या जात आहेत.
तेजस हे बेपत्ता आहेत मग त्यांचं एटीएम नेमकं कोण वापरतय? असा प्रश्न आहे. शनिवारी त्यांचं एटीएम कोल्हापुरातील एका एटीएममध्ये अॅक्टीव्ह झाल्याचं पोलीस तपासात समोर आले. दरम्यान ज्या एटीएममधून पैसे काढण्यात आले त्या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसानी मागवले आहे. तेजस हे स्वतःच एटीएम वापरत असल्याचे काही जणांकडून बोलले जात आहे. तेजस यांचा मोबाईलही बंद असल्यामुळे तो पोलिसांकडून सर्विलेन्सवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस तेजस यांच्या लोकेशनवर लक्ष ठेवून आहेत. रत्नागिरीतील पोलिस कोल्हापुरातील पोलिसांच्या संपर्कात असून तपासाला गती मिळाली आहे.