(रत्नागिरी)
तालुक्यात दीड दिवसाच्या बाप्पाला बुधवारी (ता. २०) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. तालुक्यात ठिकठिकाणी विसर्जन स्थळावर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा गणरायाचा गरज करीत तालुक्यात दीड दिवसांच्या एक हजार आसपास गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
कोकणात महत्त्वपूर्ण मानला जाणारा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गणेशोत्सासाठी गावात आनंदाने दाखल झाले आहेत. दीड दोन महिने अगोदरच गावी यायचे नियोजन केलेले असते. यावर्षीच्या गणेशोत्सवात तालुक्यात मंगळवारी गणेश मूर्तीची घराघरांत स्थापना करण्यात आली. दीड दिवस गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. तालुक्यात दीड दिवसाच्या शहरी ग्रामीण अशा एकूण ९८१ घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन साध्या पारंपरिक तसेच मिरवणुकीने वाजत-गाजत करण्यात आले.