(रत्नागिरी)
शहरातील क्रांतीनगर येथे धान्य वाटपाच्या वादातून राडा झाला होता. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शहर पोलिसांकडून 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
असिफ रिफाई (क्रांतीनगर, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 6 जणांना पोलीसांनी अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
21 एप्रिल रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास धान्य वाटपाच्या वादातून क्रांतीनगर येथे जोरदार राडा झाला होता. याप्रकरणी मेहबुब शेख अली रिफाई (38 क्रांतीनगर, रत्नागिरी) व असिफ रिफाई (क्रांतीनगर, रत्नागिरी) यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
त्यानुसार पोलिसांनी वली कमाल कमाल शेख (29), मुबारक अलीशहा मुजावर (28), कलंदर मुजावर (40), गौस मुजावर (34), मेहबुब गौर फकीर रिफाई (24), मेहबुब शेखबली रिफाई (38, सर्व क्रांतीनगर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या 6 जणांची नावे आहेत.