रत्नागिरी : सामाजिक बांधिलकीचा वसा जपणाऱ्या रत्नागिरीतील आस्था प्रतिष्ठानतर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठीच्या मदतकार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. २५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत आस्था प्रतिष्ठानने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करत असताना त्याठिकाणी मदतीसाठी येणाऱ्या इतर स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांना मोफत भोजन सेवा देण्याचे “आस्था”च्या सदस्यांनी केले.
आस्था प्रतिष्ठानमार्फत करण्यात आलेल्या मदतकार्यात कापसाळ येथील द्वारका रेशीडेन्सीच्या पन्नास ते साठ भगिनी लहानथोर अशा सदस्यांनी “आस्था” सोबत स्वयंस्फूर्तीने सेवा देण्याचे काम केले. दर दिवशी साधारण १३०० ते १५०० जेवणाचे डबे व पाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत देण्यात आले. त्याच प्रमाणे इतर मदतकार्य कपडे चादरी स्वच्छतेची साधने याचे किट्सचे वाटप सुद्दा करण्यात आले. सदर कार्यात सुयोग सावंत, मिलिंद मिरकर, भुपेंद्र परब, स्वप्नील गावखडकर, अमेय पोतदार, अजित लटके, केतन शेट्ये, दिनेश शानभाग, सनी आंबेकर, लँसी सॅराव, अतुल खानविलकर, अभि सुर्वे आणि हेमंत साळवी यांनी प्रतिष्ठान तर्फे मोलाचे योगदान दिले.
२५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत आस्था प्रतिष्ठानने जवळपास ११ हजारापर्यंत जेवण वाटप झाले. त्याचबरोबर अंगारकी चतुर्थीला १५०० जेवण व्यवस्था केली. यात मोदक, पनीर, मटार मसाला, छोले मसाला, चपाती अशी छान जेवण व्यवस्था “आस्था”कडून करण्यात आली.
रत्नागिरीतील आस्था प्रतिष्ठानतर्फे वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे. याआधी कोरोना काळात रुग्ण व नातेवाईक यांचेसाठी “आस्था”कडून ३० हजार जेवणाचे डबे वाटप मोफत स्वरूपात करण्यात आले आहे.