इंडिया टुडे उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय २०२१ या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने भारतामध्ये १६० वे स्थान पटकावले आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये २३ वे स्थान, मुंबई विद्यापीठात ६ वे स्थान पटकावून रत्नागिरीचे नाव उंचावले आहे.
गेली २४ वर्षे अशा प्रकारचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करते. या सर्वेक्षणाच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो. या सर्वेक्षणात मुख्यःत्वे महाविद्यालयाची मुलभूत माहिती, पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, नोकरीतील संधी, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकास घडवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न आणि विद्यार्थ्यांना प्रदान केलेले शैक्षणिक वातावरण आणि शिक्षणातील स्त्रोत या गोष्टीचा विचार करण्यात आला.