(मुंबई)
चौथी आशियाई खो-खो स्पर्धा तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी, आसाम येथे 23 मार्चपर्यंत होत आहे. या स्पर्धेसाठीचा भारतीय संघाची घोषणा भारतीय खो-खो महासंघाचे सेक्रेटरी एम. त्यागी यांनी केली. या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात रत्नागिरीची सुकन्या अपेक्षा सुतारची निवड करण्यात आली आहे.
भारतीय महिला संघ
प्रियंका इंगळे, गौरी शिंदे व अपेक्षा सुतार (सर्व महाराष्ट्र), निकिता पवार (भारतीय विमान प्राधिकरण), परविन निशा (दिल्ली), एल. मोनिका (कर्नाटक), बिन्दु (हरयाणा), निर्मला भाटी (राजस्थान), गुरवीर कौर (पंजाब), अर्चना माझी (ओडिशा), दीपिका चौधरी (पी. बंगाल), मीनू (हरयाणा), रंजना (आसाम), नसरीन (भारतीय विमान प्राधिकरण) व मधु (दिल्ली) राखीव : रीहका (मध्य भारत), मोनिका (बिहार) व रेश्मा राठोड (महाराष्ट्र).