(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या व शांतीनगर रत्नागिरी येथील युवक साहिल प्रशांत जाधव याने पायलट प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
साहिल जाधव या युवकाला लहानपणापासूनच वैमानिक होण्याची तीव्र इच्छा होती. साहिल याच्या प्राथमिक शिक्षणासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याला रत्नागिरी कॉन्व्हेंट स्कूलला प्रवेश घेतला. रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी सायन्सपर्यंत यशस्वीरित्या शिक्षण झाल्यानंतर साहिल याने पायलट होण्याच्या जिद्दीने बारामती येथे प्रवेश घेतला.त्यानी आपली इच्छा वृद्धींगत करत जिद्द, आत्मविश्वास, चिकाटीच्या जोरावर पायलट कोर्स हा अतिशय आवडीने यशस्वीरित्या पूर्ण केला.
साहिल प्रशांत जाधव यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला विमान चालकाचा अधिकृत परवाना देण्यात आला आहे. साहिलच्या निर्णय क्षमतेचे, धाडसाचे आणि संपादित केलेल्या कौशल्याचे सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
साहिल याने उचित ध्येय नजरेसमोर ठेवून आपले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल शांतीनगर या निवासस्थानी त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी साहिलचे वडील प्रशांत जाधव ,आई सौ. प्राजक्ता जाधव, सेवानिवृत्त शिक्षक गोपीनाथ जाधव, सौ.वैजयंती गोपिनाथ जाधव, जाकादेवी येथील संतोष पवार, वरवडे येथील रणजीत जाधव, श्रीमती शैला गमरे, सुहास गमरे, भूषण कांबळे, शेखर जाधव यांसह अनेक मंडळी याप्रसंगी उपस्थित होती. शैक्षणिक, सामाजिक ,धार्मिक अशा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कॅप्टन साहिल जाधव यांचे शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा शुभेच्छापर सत्कार करण्यात आला.