(रत्नागिरी / प्रतिनिधी )
गेले दोन वर्षापासून भाटकर कुटुंबीयांनी सुरू केलेल्या “विथ आर्या” या सेवाभावी संस्थेतर्फे “दोन घास” हा उपक्रम रत्ना जिल्हा रुग्णालयात राबवित आहेत. यामध्ये सकाळचा नाष्टा आणि दोन वेळेचे जेवण मोफत दिले जाते. रुग्णालयातील अनेक गरीब-गरजू नागरीकांना भाटकर कुटुंबीयांनी सुरू केलेल्या उपक्रमातून दोन घास हक्काचे मिळत आहे. या उपक्रमाला आता रत्नागिरी जैन समाजातील जे. लालचंद सराफ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भाटकर कुटुंबियांच्या आवाहनाला प्रतिसाद देत “दोन घास” या उपक्रमाला जे. लालचंद सराफ यांनी हातभार लावत आठवडयातील प्रत्येक मंगळवार 75 नागरिकांसाठी दोन वेळेचे जेवण देण्याचे निच्छित केले आहे.
रत्नागिरी शहरात अनेक गरीब लोक राहतात, ज्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत असते. अनेकदा गरीब वृद्ध नागरिकांना उपाशीपोटी झोपावे लागते. तर काही जण पाणी पिऊन दिवस काढतात. अशा गरीब वृद्ध नागरिकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी “विथ आर्या”च्या वतीने ‘दोन घास’ या उपक्रमाद्वारे गरीब-गरजू, वृद्ध नागरिकांना दोन वेळचे जेवण व सकाळी नाष्टा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात मोफत याठिकाणी दिला जातो. भाटकर कुटुंबीयांच्या उपक्रमाला जे लालचंद सराफ यांच्या मार्फत दररोज १५० नागरीकांना सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळचे जेवण वितरीत केले जाणार आहे. या उपक्रमाला आता जे लाल सराफ यांच्या माध्यमातून दिले जाणारे दोन घास गरीब गरजू भुकेलेल्याना तसेच रुग्णालयातील रूग्णांना जीवनदान देणारे ठरणार आहे.
यावेळी हर्षद भाटकर म्हणाले, लोककल्याणासाठी चाललेल्या ह्या निस्वार्थीपणे कार्यात जे लालचंद सराफ यांनी घेतलेला पुढाकार हा महत्वाचा आहे. रोजची कामधंदे सांभाळून रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही मदत करत असतो. निःस्वार्थ सेवा देण्याच्या हेतूने जे लालचंद सराफ यांच्या सारखे असंख्य हात पुढे आले तर आम्हाला ऊर्जा मिळेल. आमच्या समाजकार्यात अधिकाधिक लोकांनी आर्थिक किंवा ज्यांना वस्तू स्वरूपात मदत करायची असेल त्यांनी 8999834342 हर्षद भाटकर, 9699347793 ऋषिकेश भाटकर , 9823577830 राहुल ओसवाल यांना थेट संपर्क करावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.