(रत्नागिरी)
5 वी राष्ट्रीय कॅडेट क्योरॉगी पूमसै राष्ट्रीय स्पर्धा 24 ते 26 दरम्यान तेलंगणा हैद्राबाद गोचीबोली बालयोगी इंडोर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पंच म्हणून रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन सलग्न युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटर रत्नागिरी शाखा साळवीस्टॉप येथीलल प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षक तेजकुमार लोखंडे यांची राष्ट्रीय पंच पदी नियुक्ती झाल्याबाबत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाकडून परिपत्रकाद्वारे जिल्हा संघटना यांना कळविण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून तेजकूमार लोखंडे व वृषाली चव्हाण या दोघांची निवड झाल्याने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे (बीड), उपाध्यक्ष विनायक गायकवाड (मुंबई), धुळीचंद मेश्राम (गोंदिया), महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेशवरराव कररा, कार्यकारणी सदस्य नीरज बोरसे (औरंगाबाद), सदस्य अजित घारगे (जळगाव), सतीश खेमस्कर (चंद्रपूर), अतिरिक्त उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, सुभाष पाटील तांत्रिक कमिटी अध्यक्ष सुशांत भोयर, समिती उपाध्यक्ष वृषाली पाटील जोगदंड (नांदेड), राजेश महाजन (उस्मानाबाद), भालचंद्र कुलकर्णी ( सिंधुदुर्ग), सहसचिव लेखा चेत्री (यवतमाळ), कौशिक गरवलीया (ठाणे), विनायक येणापुरे (सांगली), रत्नागिरी तायक्वांदो असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री शैलेश गायकवाड (P S I), श्री विश्वदास लोखंडे(उपाध्यक्ष), जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक बेल्ट ), जिल्हा कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी (शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते), युवा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री राम कररा (शासनाचे युवा पुरस्कार विजेते) यांनी या दोन्ही पंचाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.