(रत्नागिरी)
शिवसेना जिल्हा कार्यालय, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी व युवासेना कार्यकारणी सदस्य श्री. पवन जाधव यांच्या उपस्थितीत युवासेना रत्नागिरी विधानसभा कार्यक्षेत्रातील युवासैनिकांचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी युवासेनेच्या विधानसभा कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यात आला व रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. सदर नियुक्त्या पुढीलप्रमाणे
गावखडी उप विभाग युवाधिकारी – मिलिंद पाटील, कोतवडे उप विभाग युवाधिकारी – सचिन रांबाडे, खेडशी उप विभाग युवाधिकारी – रोहित पिंपळे, वाटद उप विभाग – युवाधिकारी अनिल फडकले, युवासेना कॉलेज युनिट तालुका युवाधिकारी पारस प्रदीप साखरे, उप शहर युवाधिकारी – दीक्षांत मयेकर व पारस पाटील, नाचणे विभाग उप शाखा प्रमुख – प्रसाद नागवेकर, देवराज सुर्वे, प्रणित विचारे, सुनील सामंत, मयुरेश ढेपसे यांची नियुक्ती करण्यात आली.
तर तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या पुढाकारने शार्दूल गवाणकर, गुरुप्रसाद कोतवडेकर, अतुल सोनवणे, सुजल सावंत, ओम यादव, अक्षय झोरे, प्रज्योत कांबळे, सूरज पटेल, रितेश पवार, रोशन कदम, स्वरूप राऊत, अतिष गावडे, साहिल सोलम, अमोल जगताप, प्रकाश देतरोजा, सौरभ मालप, अथर्व पवार, राहुल भोगले, सिद्धेश राणे, यश साळुंखे, अजीम नदाब, पवन लोंढे हे युवासेनेत सक्रिय झाले.
या प्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, युवासेना जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, सुजित किर, उप जिल्हा युवाधिकारी हेमंत खातू, युवासेना मुंबई समन्वयक अथर्व साळवी, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उप शहरप्रमुख महेश पत्की, नितीन तळेकर, बावा चव्हाण, शहर युवाधिकारी आशिष चव्हाण, तालुका कार्यालय प्रमुख संदीप सुर्वे व अन्य मान्यवर उपस्थित होते.