( रत्नागिरी / प्रतिनिधी )
5 वर्षात 1 लाख सूक्ष्म, लघू उपक्रम स्थापित करणे, त्यातून दहा लाख रोजगार उपलब्ध करणे हे मुख्यमंत्री रोजगार योजनेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी युवक युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य शासनाकडून 50 लाखापर्यंत कर्ज घेउन उद्योग उभारुन रोजगारनिर्मिती करता येते. या योजनेतून रत्नागिरी जिल्हयासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुळकर्णी यांनी केले आहे.
सीएमईजीपी अंतर्गत उत्पादन प्रकल्पासाठी 50 लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे. यामध्ये शासन आर्थिक अनुदान देणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 15 टक्के तर ग्रामीण विभागात 10 टक्के, विशेष प्रवर्गासाठी शहरी 25 टक्के आणि ग्रामीण 35 टक्के अनुदान दिले जाणार आहे.