(मुंबई)
अदानी समूहाकडून जीएसटी वसूल न करण्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षात विमानातळ ऑपरेशन व्यवसायाता वाढ होत आहे. अशावेळी जयपूर विमानतळाचे अदानी समूहाला संचालनाचे अधिकार मिळाले आहेत. या विमानतळाशी संबंधित करारावर अदानी समूहाला मोठा नफा झाला आहे. आता या डीलवर समूहाला जीएसटी भरावा लागणार नाही.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एथॉरिटी फॉर एडव्हान्स रुलिंग्ज च्या राजस्थान खंडपीठाला विचारले होते की, अदानी जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला व्यवसाय सोपवल्यावर वस्तू आणि सेवा कर लागू होईल का? यावर एएआर ने या संदर्भात आपला निकाल दिला आहे. जीएसटी कायद्यांतर्गत व्यवसायाचे हस्तांतरण किंवा त्याचा स्वतंत्र भाग म्हणून हस्तांतरण ही सेवा मानली जाते. ऑक्टोबर २०२१ मध्ये, अदानी समूहाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन, व्यवस्थापन आणि विकास भारतीय विमानतळ प्राधिकरण कडून घेतला आहे. हे विमानतळ भारत सरकारने अदानी समूहाला ५० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात अदानी समूहाकडून जीएसटी वसूल होणार नाही.