(देवरूख / सुरेश सप्रे)
धनुष्यबाण चोरलंय, ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन यावे आपण मशाल घेऊन लढा देऊन त्यांना चारीमुंड्या चित करून आपली ताकद दाखविणेसाठी एकत्रपणे उद्धवजींच्या पाठी खंबीरपणे उभे राहूया, असे आवाहन माजी मंत्री रविंद्र माने यांनी केले. संगमेश्वर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक आयोगाच्या चुकीच्या निर्णयाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला, त्यावेळी माने बोलत होते. चोरबाजाराचे मालक धनुष्यबाण पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही, असंही माने म्हणाले.
ज्या पद्धतीनं आपलं शिवसेना हे नाव चोराना दिलं गेलं. आपलं धनुष्यबाण चोरांना दिले गेले, ज्या पद्धतीनं हे कपटानं राजकारण करतात त्या पद्धतीनं मशाल चिन्ह देखील घालवतील. पण, धनुष्यबाण चोरलंय त्यांना सांगतो, तुमच्यापुढं मशाल चिन्ह घेत लढून आप़ण एकत्रित येत त्यांना गाडून टाकून उद्धवजींचे हात बळकट करूया, असे आवाहन सुभाष बने यांनी केले
माझ्या हातात काही नाही पण एवढंच सांगतो. तरुण रक्त त्यांनी चेतवलं आहे. आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. त्यासाठी रस्त्यावरची लढाई करणेसाठी खांद्याला खांद्याला लावून शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेऊन चोरांना धडा शिकवूया, असं असे युवा नेते रोहन बने यांनी सांगितले. तुमच्या कितीही पिढ्या आल्यातरी कोणीही बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेनेला संपवू शकणार नाही, असं त्यांनी सांगितले.
संगमेश्वर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक आयोगाच्या चुकीच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला.
या निषेधार्थ संगमेश्वर तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला. या निर्णयामुळे शिवसैनिकांसोबतच सामान्य जनतेलाही लोकशाही संपल्याचे वाटू लागले आहे. येणार्या काळात तीव्र संघर्ष करून पक्ष वाढविण्याचे आवाहन मा. मंत्री रविंद्र माने, मा. आमदार सुभाष बने व रोहन बने यांनी उपस्थितांना केले. या वेळी तालुक्यातील महीला आघाडीच्या सौ. नेहा माने, सौ. स्मिता लाड, युवा सेनेचे मुन्ना थरवळ, एस्ताक कापडी, नगरसेवक वैभव पवार, बाबू मोरे यांचेसह प्रमुख पदाधिकारी व तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी उपस्थित होते.