नर्सिंग आणि एमबीबीएसच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना कोविड सेवेत सामावून घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रत्नागिरीतील दि यश फाउंडेशनचे ६२ विद्यार्थी बुधवारपासून कोविड सेवेत दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महिला कोविड रुग्णालयात हे विद्यार्थी तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली सेवा देऊ लागले आहेत.