(रत्नागिरी)
म्यानमार देशातील प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात आलेले भंते डॉ.संदामुनी महाथेरो यांनी करबुडे येथे ऐतिहासिक अशोक स्तंभाला भेट दिली. यावेळी भंते डॉ. संदामुनी महाथेरो यांचे नऊ गाव समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
देशातील अनोखा अशोक धम्म चक्र मुद्रांकित क्रांतिकारी स्तंभाला भंते डॉ.संदामुनी महाथेरो यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भंतेना या ऐतिहासिक स्तंभाबाबत स्थानिकांनी माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील अनेक बौद्ध धम्म बांधव उपस्थित होते.