(गुहागर)
गुहागर तालुक्यातील उमराठ येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं. १ शाळेत दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सदिच्छा समारंभ पार पडला. दिनांक २७ ऑगस्ट २०१४ पासून कार्यरत असणारे पदवीधर शिक्षक श्री प्रदिप रामाणे यांनी सेवेची साडे आठ वर्षे पूर्ण केली आणि दिनांक ३ मे २०१९ पासून कार्यरत असणाऱ्या सौ. सायली पालशेतकर यांनी आपल्या सेवेची चार वर्षे पूर्ण केली. या दोन्ही शिक्षकांची ऑनलाईन बदली झाल्यामुळे दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी दोन्ही शिक्षकांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ तसेच भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी श्री अनिल अवेरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उमराठ गावचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री संदीप गोरीवले, श्री अशोक जालगावकर, श्री सुरेश पवार, श्री विनायक कदम, उमराठ नंबर 1 शाळेचे मुख्याध्यापक श्री नाटेकर सर तसेच शाळेतील विद्यार्थी कुमारी अपूर्वा सावंत, कुंजल डिंगणकर, रिश्मिता पवार, श्रावणी गावणंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आणि दोन्ही शिक्षकांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षक रामाणे आणि पालशेतकर मॅडम यांनीही आपल्या आठवणी सांगितल्या.
यावेळी उमराठ गावांमधील पालक तसेच ग्रामस्थ बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीकांत कदम यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शेवटी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री अनिल अवेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सदिच्छा समारंभ कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.