(मुंबई)
मोबाईलवर गेम खेळण्यास आईवडिलांनी विरोध केल्यामुळे निराश झालेल्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना माहीम परिसरात घडली आहे.
आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव मुतुपेची नटराजन असे आहे. मुतुपेची ही नववीत शिकत होती. तिला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन होते.त्यामुळे ‘तू आता नववीत गेली आहेस, मोबाईलवर गेम खेळणे आता बंद कर आणि जरा अभ्यासावर लक्ष दे’, असे तिच्या आईवडिलांनी बजावले. पण त्यामुळे तिला राग येवून ती निराश झाली. याच नैराश्यातून मुतुपेची हिने रात्री माहीम पोलीस वसाहती समोरच्या आपल्या बीएन-९ या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुतुपेची हिचा जागीच मृत्यू झाला. माहीम पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.