(पुणे)
मुंबईसह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराज यांचे पुणे-सातारा महामार्गावर अपघाती निधन झाल्याची माहिती मिळत आहे.
ड्रायव्हरला डुलकी आल्याने कार थेट महामार्गाच्या दुभाजकावर जाऊन आदळली. सततच्या प्रवासामुळे कार चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. महाराजांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात ठेवले जाणार आहे.
पुणे बंगळूरू महामार्गावर साताऱ्यातील सातारा शहरातील अजिंठा चौक परिसरात कार दुभाजकावर आदळून हा अपघात झाला. यामध्ये कारच्या समोरील काच फुटून मोडक महाराज हे बाहेर फेकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. कल्याण येथील स्वामी समर्थ मठातील अरुण मोडक हे कारने कल्याणहून कोल्हापूरकडे जात होते