(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी भुतेवाडी येथील श्री भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाला २६ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. यावेळी २६ रोजी सकाळी ९ वा. देवीचे मुखवटे लावणे, १० वा. घटस्थापना, ११ ते १२ वा. आरती व प्रसाद, दररोज रात्री १० वा. वाडीतील ग्रामस्थांचे भजन व आरती, ४ ऑक्टोबर बलिदान दिवशी दु. १२ वा. आरती व प्रसाद, रात्री ८ वा. देवीचा गोंधळ, ५ ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी तोरणे बांधून पूजा आरती करणे, सायंकाळी ४ वा. सोने लुटून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या सर्व कार्यक्रमाचा व देवीच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री भगवती देवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.