(रत्नागिरी)
बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शनिवार, १ जुलै रोजी दुपारी १ वा. पूर्णगड येथील विठलाई देवी स्टॉपजवळ घडली होती.
या अपघातातील राजेंद्र श्रीकांत मुंगळी (४५, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. शनिवारी सकाळीच राजेंद्र मुंगळी आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन एकटाच घरातून बाहेर पडला होता. दुपारी त्याचा अपघात होऊन तो विठलाईदेवी स्टॉपजवळ बेशुध्द अवस्थेत मिळून आल्यावर तेथील ग्रामस्थांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे तपासात उघड झाले आहे. पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..