(मुंबई / किशोर गावडे)
मुलुंड निलम नगर पूर्व येथे साई संस्कृती सोसायटी फेस १ येथे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सौ. तृप्ती चव्हाण कांबळे यांच्या स्वरआशा कराओके डबिंग, एडिटिंग, स्टुडिओचा शानदार शुभारंभ शिवसेना आमदार विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांच्या हस्ते शनिवारी ३ डिसेंबर रोजी करण्यात आला.
यावेळी आमदार रमेश कोरगावकर यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की, मुलुंडमध्ये स्वरआशा करावके स्टुडिओ हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गायनाची उंची वाढवली आहे. या स्टुडिओतून अनेक गायक तयार होतील, अशा अपेक्षा कोरगावकर यांनी व्यक्त केली. यावेळी प्रसिद्ध उद्योजक सतिश अधिकारी यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करताना म्हणाले की, गायनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गायकांना चांगली संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वर आशा करावके स्टुडिओतील प्रत्येक गायक चांगली कला सादर करतील व नावलौकिक वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संगीत दिग्दर्शक सौ. तृप्ती चव्हाण यांनी आपल्या मधुर आवाजात “मोगरा फुलला” हे गाणे अप्रतिम रीत्या सादर केले व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या गायनाला चांगलीच दाद दिली. यावेळी नाट्य कलावंत व वस्त्रहरण फेम – संजीवनी जाधव, पत्रकार किशोर गावडे, देवामृत फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया जाधव, शाखा प्रमुख अमोल संसारे, महेश पवार , चित्रपट क्षेत्रातील कलाकार पंकज खामकर, निर्माता – विनय पाटील, संगीतकार – आनंद मेनन, जे डी कराओके स्टुडिओचे (भांडुप ) मार्गदर्शक व प्रसिद्ध गायक राजेश आयरे सर, जेडी सर, चित्रपट दिग्दर्शक नितीन कांबळे विश्राम चव्हाण, नृत्य दिग्दर्शक संतोष भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते.