(संगलट / इक्बाल जमादार)
रत्नागिरी जि.प. च्या ‘जाणू विज्ञान,अनुभवो विज्ञान’ या अनोख्या उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील मळे शाळेतून मानिनी आणि मंथन आग्रे या सख्ख्या बहीण- भावाची इस्त्रो-नासा अभ्यास दौर्यासाठी नुकतीच निवड झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. मुलांच्या निवडीबद्दल त्यांची आई मानसी आग्रे यांचा बॅंक आॅफ महाराष्ट्र शाखा दापोलीचे वतीने व्यवस्थापक सुनील वानखेडे यांचे हस्ते ९ नोव्हे.रोजी भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांसह विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नासा दौरा करणेसाठी लागणारी बॅंकिंग सेवा तत्पर पूर्ण करुन सेव्हिंग पासबुक देण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित अभियंते गोसावी, मार्गदर्शक दिनेश चिपटे, रश्मी पेवेकर, अनंत बडबे उपस्थित होते.