तौक्ते चक्रीवादळाच्या पाहणीकरता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावरुन त्यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांचंही नाव आता त्यात जोडलं गेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे नौटंकी दौरा असल्याची टीका राणे यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर अनेक आरोप करत त्यांच्या कारभाराचे धिंडवडे काढले. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली…किती वेळ? फक्त तीन तास…तीन तासाचा हा दौरा केला. दोन दिवसांत भरपाई देणार म्हणाले.. दिली का? का नाही दिली अजून… भरपाईची ठोस रक्कम अजूनही का जाहीर केलेली नाही? असे अनेक सवाल राणेंनी या सरकारवर उपस्थित केले आहेत.