अतिवृष्टीमुळे मुंबई – गोवा महामार्गावरील खेडमधील लवेल येथे उड्डाणपूलाला भेगा पडल्या आहेत. तर रस्ताही खचल्याने राष्ट्रीय महामार्ग धोकादायक बनला आहे. वाहनचालकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने क्वालिटी कंट्रोलद्वारे चौकशी करावी अशी मागणी जनमानसातून होत आहे.
लवेल येथील उड्डाणपुलावरून बांधकाम दर्जाहीन केल्यामुळेच उड्डाणपूल पुलावरील रस्त्याला भेगा पडल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्ताही खचला आहे. या महामार्गावरून अवजड वाहने सातत्याने ये-जा करीत असल्यामुळे हा महामार्ग धोकादायक बनला आहे. त्याचा फटका सर्वानाच बसणार आहे. याची दखल राष्ट्रीय महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेऊन उड्डाणपूलावरील दर्जाहीन कामाची दुरूस्ती करून घ्यावी अशीही मागणी होत आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !