किल्ले रायगडावर ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातून लोक किल्ले रायगडावर दाखल होत असतात. या पार्श्वभुमीवर मुंबई गोवा महामार्ग आणि वाकण खोपोली मार्गावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या बाबतचे आदेश राज्याच्या गृहविभागाने जारी केले आहेत.
दिनांक ३१ मे ला रात्री १२ वाजेपासून २ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत तर ४ जूनला रात्री १२ वाजेपासून ते ६ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत या दोन्ही मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत महामार्गावरून १६ टन आणि त्याहून अधिक क्षमतेचे ट्रक, कंटेनर, मल्टी अँक्सल व्हेईकल, ट्रेलर्स, रेती आणि खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
दूध, इंधन, गॅस, औषध पुरवठा, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू नसणार असल्याचे शासन आदेशात नमुद करण्यात आले आहे.
किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा १ जून ते ७ जून या कालावधीत संपन्न होणार आहे. या निमित्ताने गडावर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध भागातून मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत. या निमित्ताने गडावर विवीध सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध भागातून मोठ्या संख्येनी शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन गडावर दाखल होणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मुंबई गोवा महामार्गावरील तसेच वाकण पाली खोपोली मार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे.