(देवरूख / सुरेश सप्रे)
मी अद्याप राष्ट्रवादी पक्ष त्याग केलेला नसून मी अजितदादा पवार गटात असून मी शिंदे गटात प्रवेश केल्याचे वृत्त पूर्णतः निराधार आहे, असे बापू शेट्ये स्पष्ट केले.
गेली पंचवीस वर्षे मी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेऊन जनसेवा करीत असून मीं लपून छपून व कोणाच्या दबावाला व कोणाला घाबरून कुठल्या पक्षात प्रवेश करणारा नाही. तसेच असले गटातटाचे राजकारण मुळीच करणार नाही. मी सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या दरबारात जाऊनच निर्णय घेईन. मी अजितदादा पवार यांच्यासोबतच असल्याने शिंदे गटात प्रवेश केल्याचे वृत्त निराधार असल्याचे बापू शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, सुनील तटकरे, बाबाजी जाधव, शेखर निकम, अजित यशवंतराव यांच्या शिफारशीने माझी रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाली असताना मी अन्य पक्षप्रवेश करणे माझ्या रक्तात नसून मी शिंदे गटात नाही तर राष्ट्रवादीतच (अजित पवार गट) असून राष्ट्रवादी मजबूत करण्यात योगदान देत आहे. तेव्हा अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असेही बापू शेट्ये यांनी आवाहन केले आहे.