(मुंबई)
मुंबईतील मीरारोड या ठिकाणी झालेल्या सरस्वती वैद्यच्या हत्याकांडामुळे राज्यासह संपूर्ण देश हादरला आहे. मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या केली. सरस्वती वैद्य हत्याकांड तपासात पोलिसांना नवीन महिती मिळाली आहे. मनोज साने डेटिंग ॲपवर खूप सक्रिय होता. त्याच्या मोबाईल फोनच्या तपशीलाच्या आधारे ( सीडीआर) त्याच्या संपर्कात असणाऱ्यांकडे पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. आरोपी साने हा सरस्वतीचा मोबाईल फोन देखील वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोजचे अनेक चॅट्स पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याच्या मोबाईल फोनच्या तपशीलाच्या आधारे ( सीडीआर) त्याच्या संपर्कात असणाऱ्यांकडे पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.
आरोपी मनोज साने हा सेक्स अॅडिक्ट होता आणि त्यामुळे त्याचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीच्या मोबाईलवरून अनेक महिलांसोबतचे चॅट्स पोलिसांच्या हाती लागले आहे. यामुळेच सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांच्यात कायम भांडणे होत होती. डेटिंग ॲपच्या माध्यमातून तो महिलांशी चॅट करायचा, असे पुरावेही मिळाले आहेत. आरोपीने सरस्वती ही माझ्या मुलीसारखी असल्याचे पोलिसांना सांगितले होते. पण आरोपी मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी काही वर्षांपूर्वी नालासोपारा पूर्वेला असलेल्या तुंगारेश्वर मंदिरात लग्न केले होते.
मनोज साने याने फेकलेल्या मृतदेहाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नुकतेच सानेच्या घरात तसेच घराशेजारील नाल्यात शोध घेतला. मनोज सानेच्या घरातून पोलिसांनी १३ विविध प्रकारचे पुरावे गोळा केले आहेत. त्यात कुकर, करवत, बादल्या, पातेले आदींचा समावेश आहे. हत्येपूर्वी सरस्वतीवर विषप्रयोग झाल्याची शक्यता असून त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत. मनोज साने गुगलवर यासंदर्भातील माहिती देखील मिळवत होता, असे पोलिसांनी सांगितले. तर दोन वर्षांपूर्वी सरस्वतीच्या बहिणीने आत्महत्या केली होती त्याबाबतही चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.