(रत्नागिरी/प्रतिनिधी)
शिरगाव मोहल्ला येथे पत्नीने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 25 जुलै रोजी रात्री 11.30 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद खातून सर्फराज काझी यांनी शहर पोलीस स्थानकात दिली आहे.. त्यानुसार खातून यांचा पती सर्फराज शौकत काझी (45, शिरगाव मोहल्ला मशिदीजवळ, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खातून या 20 ते 23 जुलै पर्यंत चिपळूणातील खेर्डी मोहल्ला येथील आपल्या माहेरी गेल्या होत्या. त्या 23 जुलै रोजी त्या पहाटे 4.30 वाजता पतीच्या घरी परतल्या. यावेळी पतीने खातून यांच्याकडे पैशाची विचारणाा केली. माहेरहून पैसे न आणल्याच्या राग धरुन पती सर्फराजने पत्नी खातून यांना ठोशांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत गळा दाबला, असे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानुसार पोलिसांनी पतीविरोधात भादविकलम 324, 323, 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे