(संगमेश्वर)
माहितीचा अधिकार 2005 ची योग्य रीतीने अंमलबजावणी व्हावी. नागरिकांचे हक्क अबाधित राहावेत. नागरिकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी. विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात योग्य रीतीने कामे होतात किंवा नाहीत यासाठी महासंघ महाराष्ट्र संगमेश्वर तालुक्याचे वतीने माहिती घेतली जाते. नागरिकांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाते का नाही याची दक्षता घेतली जाते.
गावागावात कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्यांची सदस्य नोंदणी करून स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीचा कारभार योग्य प्रकारे होत आहे की नाही. जनतेची कामे होत आहेत की नाहीत याबाबत कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली जाते. गावातील जनतेची विकास कामे व्यवस्थित होत आहेत की नाहीत, कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत आहेत की नाहीत, कर्मचारी योग्य माहिती देतात की नाही, कार्यालयात सी.सी टिव्ही व बायोमेट्रिक यंत्रणा बसविली आहे किंवा नाही. त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार अधिनियमाप्रमाणे कार्यालयाचे दप्तर तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्मचारी सहकार्य करीत नसतील टाळाटाळ करीत असतील तर त्याची तक्रार करावी. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आला. त्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात इतर तालुक्यातून हस्तक्षेप, युवा एकता सामाजिक संस्था संगमेश्वर यांच्या आलेल्या त्यांचे अर्जावर निर्णय घेऊन संबंधित विभागाकडे निवेदन देणे, त्यांचे उपोषणाला पाठिंबा देणे, तसेच सर्व संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी यांनी एकजुटीने राहून सहकार्य करण्याबाबत तसेच संगमेश्वर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची माहिती पोलिस निरीक्षक देवरूख, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात माहिती व योग्य कार्यवाही करिता देण्याचे निर्णय सर्वानुमते घेतला गेला.
यावेळी सभेला आर टी आय कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र चे रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री राज बोथरे उपस्थित होते. त्यांचे स्वागत अध्यक्ष मनोहर गुरव यांचे हस्ते करण्यात आले. श्री बोथरे त्यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी नूतन उपाध्यक्ष श्री उदय पवार यांचे अभिनंदन जिल्हा उपाध्यक्ष राज बोथरे व कार्याध्यक्ष शेखर जोगळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव संतोष कांबळे, उप संयोजक हरिश्चंद्र गुरव, सरचिटणीस विजय गुरव, सक्रिय कार्यकर्ते अमोल जाधव, प्रमोद रेवणे, महिला अध्यक्षा नसिरा काझी, उप संघटक सुरेश केदारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी सचिव श्री संतोष कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.