(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने एकजुटीने काम करावे, याकरीता संगमेश्वर तालुका कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक व उपस्थित पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत संगमेश्वर तालुक्याचे सचिव श्री संतोष कांबळे यांनी केले. कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन महासंघाचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांचे हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला हार घालून करण्यात आले.
या मेळाव्यामध्ये प्रथम पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार संबंधीच्या आलेल्या तक्रारीवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत व विविध विभागात काम सुरळीत व्हावे, या करीता वरिष्ठ पातळीवर सी सी टिव्ही बसविणे बाबत मागणी करण्यात आली होती. त्याचे आदेश पारित झाले, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही विभागातून करण्यात आलेली नाही. त्यावर कार्यवाही करणेबाबत वरिष्ठांशी चर्चा करणे, अर्ज देणे. जिल्हाधिकारी महोदय यांना भेटून योजनांची अवस्था, रस्ते,जलजीवन मिशन, करजुवे, माखजन व अन्य ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा, मोठ्या प्रमाणात जंगलतोड बाबत आलेल्या तक्रारी, व्हिडिओ बाबत विचार विनिमय करण्यात आला. त्याच प्रमाणे आपल्या गावातील कार्यक्षेत्रातील निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांचा आढावा घेऊन योग्य तो संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून प्रथम निदर्शनास आणून देणे, ग्रामसभेत उपस्थित राहून जनहितार्थ प्रश्न मांडणे, माहिती मागवणे. संबंधित विभागाला अर्ज करणे, तर आवश्यक ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम नुसार माहिती मागविणे, अनेक महिने रखडून ठेवलेली कामे व वर्ष अखेर अनेक विभागात घाई गडबडीने खर्ची टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु काही ठिकाणी कामे एप्रिलमध्ये करीत आहेत त्याबाबत अनेक तक्रारी येत असून त्याबाबत सर्व माहिती माहितीचा अधिकार अंतर्गत सनदशील मार्गाने जनहितार्थ मागणी करण्याच्या सूचना अधिकार कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
जलजीवन मिशन, रस्ते याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. आवश्यक नसलेल्या ठिकाणी योजना राबविली जात आहे. तसेच अंदाजपत्रक वाढवून करोडो रुपयाच्या निधीचा दुरुपयोग होत आहे. त्याची माहिती फोटोंसह मागविणे व आवश्यक ठिकाणी उपोषणाची दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे ठरविले. काही माध्यमे जनतेचे प्रश्न जनतेसमोर मांडण्यासाठी प्रसिद्धी करता दिली जाते. परंतु त्या दिल्या जात नाहीत, याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी यांचेशी चर्चा करून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी महासंघाचे संगमेश्वर तालुका पदाधिकारी श्री शेखर जोगळे, श्री एकनाथ मोहिते, श्री अनिल सागवेकर, श्री सुरेश केदारी, श्री विजय चव्हाण, श्री हरिश्चंद्र गुरव, श्री विजय साळुंखे, सौ.सुहासिनी पांचाळ, श्री दिपक भेरे, श्री विजय चव्हाण, श्री विजय गुरव, श्री प्रकाश जाधव, श्री शेखर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गावातील विकासात्मक झालेल्या कामांची सनदशील मार्गाने माहिती घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आम्ही महासंघ मुंबई चे संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाष बसवेकर मार्गदर्शनाखाली काम सुरू असल्याचे संगमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष श्री मनोहर गुरव यांनी सांगितले. शेवटी श्री संतोष कांबळे सचिव यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.