(रत्नागिरी)
तालुक्यातील मावळंगे येथील श्रीमती संगीता गजानन नेने (वय ६८) हिने आजाराला कंटाळून घराजवळ असलेल्या विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली.
याबाबत मृत वृद्धेच्या मुलगीने आदिती भूषण बोडस (रा. पडेल, ता. देवगड) यांनी याबाबत पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यांमध्ये खबर दिली. मावळंगेतील नेने वाड्यामध्ये राहणाऱ्या नेने घरी एकट्याच राहत होत्या. आजाराला कंटाळून त्यांनी तिथेच असलेल्या एका विहिरीमध्ये सकाळी उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.