(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड वाचनालयात थोर समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करण्यात आला. हा जयंती कार्यक्रम बालिका दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. काय॔कमाला मालगुंड जीवन शिक्षण शाळा नं.१ या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व मुख्याध्यापिका नाईक उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी शिक्षण प्रणेत्या, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन करून बहुमोल मार्गदर्शन केले.