रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) तसेच माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती बारामती गरुडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनद्वारे पिक संरक्षण औषध फवारणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. मालगुंड येथील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक विद्याधर शशिकांत पुसाळकर यांच्या आंबा बागेत मालगुंड परिसरातील अनेक शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे पीक संरक्षण औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तर यावेळी गरुडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी सानप यांनी ड्रोनबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखविले.
यावेळी या प्रात्यक्षिकासाठी रत्नागिरीचे तालुका कृषी अधिकारी नानाजी भोळे, कृषी अधिकारी माधव बापट, मंडळ कृषी अधिकारी विनायक अखेर, बीटीएम हर्षला पाटील, कृषी सहाय्यक प्रदीप भुवड, सचिन गोडसे तसेच मालगुंड परिसरातील अनेक शेतकरी, बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रात्यक्षिकामध्ये गरुडा एरोस्पेस कंपनीचे प्रतिनिधी सानप यांनी सन 2022 23 अंतर्गत ड्रोनद्वारे बागेतील पिकांचे संरक्षण कसे केले जाते, याबाबत अतिशय परिपूर्ण माहिती देऊन औषध फवारणी कशाप्रकारे केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे काम केले यावेळी सर्वच शेतकऱ्यांना हा उपक्रम भावला. या उपक्रमाबद्दल मालगुंड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून असेच अनेक समाज उपयोगी उपक्रम कृषी विभागाने हाती घ्यावेत असे, मत व्यक्त केले जात आहेँ.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !