(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती यांचेवतीने कविवर्य केशवसुत स्मारकात घेण्यात आलेल्या आधारकार्ड व कोविड बूस्टर डोस शिबिराला मालगुंड परिसरातील ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद लाभला. यांमध्ये 95 जणांनी आधारकार्ड अपडेट व नवीन नोंदणी तर 146 जणांनी बूस्टर डोस शिबिराचा लाभ घेतला. तसेच या शिबिराप्रसंगी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने एकूण 97 जणांची एनसीडी म्हणजेच आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रक्त, लघवी, थुंकी, शुगर, ब्लडप्रेशर आदीं तपासण्या करण्यात आल्या.
मालगुंड येथे आधारकार्ड कॅम्प व बूस्टर डोस कॅम्पचे आयोजन करण्यासाठी मालगुंड येथील कवि केशवसुत स्मारक समितीचे विद्यमान सदस्य तथा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, मालगुंड ग्रामपंचायत सदस्या सोनिया शिंदे व पत्रकार वैभव पवार यांनी विशेष पुढाकार घेऊन मालगुंड येथील कवी केशव स्मारक समितीच्या सहकार्याने दोन्ही शिबिरे यशस्वी करण्यात उल्लेखनीय कामगिरी केली. या कामी त्यांना कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील, बबन तांदळे, विलास राणे आदींसह कवी केशवसुत स्मारकाचे कर्मचारी कुमार डांगे, स्पृहा लिंगायत, अस्मिता दुर्गवळी तसेच मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी व ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ केळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
यातील आधारकार्ड शिबिराच्या यशस्वीतेसाठी रत्नागिरी येथील पोस्ट खात्याचे मुख्य अधिकारी गणपत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोस्ट ऑफिसचे देविदास पट्टेवार, मंगेश सुरवसे व किरण विचारे आदींनी आपले विशेष योगदान दिले. तर बुस्टर डोस शिबिराच्या यशस्वीतेमध्ये मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुरा जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली समुदाय अधिकारी डॉक्टर आसिफ सय्यद, आरोग्यसेवक मोहन सातव, आरोग्य सहाय्यिका स्मिता देसाई, आरोग्य सेविका माधवी घाणेकर आदींसह सर्व आशा स्वयंसेविका सेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.