(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड मध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३मध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ५वी ते इयत्ता १०व १२वी च्या पालकांची सभा २१ रोजी कै. सदानंद बळीराम परकर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्री सुनिल ऊर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेचे प्रस्तावित व उपस्थित संस्था पदाधिकारी यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वाघमारे यांनी केले. उपस्थित पालकांना शिक्षण संस्थेचे सचिव व प्रशालेचे Ceo श्री विनायक राऊत यांनी विशेष मार्गदर्शन यावेळी केले. एकूणच प्रशालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात हे आवर्जुन सांगितले भविष्यात शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम पाठिशी राहील असे पालकांना सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष आणि सभेचे अध्यक्ष श्री सुनिल ऊर्फ बंधू मयेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेने आणि प्रशालेने विध्यार्थ्यांसाठी कोरोना काळात केलेलं काम उपस्थित पालकांसमोर मांडले आणि भविष्यात देखिल संस्था विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे काम करील व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोई सुविधा उपलब्ध करून देईल. त्यासाठी पालकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे असे उपस्थित पालकांना सांगितले. विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज चा निकाल हा सातत्याने चांगला लागत आहे यासाठी त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले.
याच ठिकाणी इयत्ता १० व इयत्ता १२ वी मध्ये पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला गेला. पालकांमधून श्री साळवी, श्री सावंत यांनी आपल्या मनोगतातून संस्था शाळा व शिक्षकांना धन्यवाद दिले. सभेला शिक्षण संस्थेचे खजिनदार श्री संदीप कदम, संचालक श्री विवेक परकर, निमंत्रित संचालक श्री मेहंदळे उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन श्री अमित जाधव यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री नितिन मोरे यांनी मानले.