(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे रहिवासी व मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड चे हिंदी विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री. उमेश श्रीराम केळकर यांना सन 2020/21चा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे मार्फत अँथनी फर्नांडिस यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा राष्ट्रभाषा प्रचारक पुरस्कार पुणे येथील कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दैनिक आज का आनंद चे संपादक श्री. आनंद अगरवाल, व संस्थाध्यक्ष श्री. उल्हास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार 25 मार्च सकाळी 10 वाजता एस. एम. जोशी फाउंडेशन सभागृह पत्रकार भवन पुणे येथे संपन्न झाला.
श्री. उमेश केळकर हे मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड मध्ये गेली अनेक वर्षे हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत, तसेच राष्ट्रभाषा प्रचार सभा पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषा परिक्षांस विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी बसवून प्रत्येक वर्षी हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार करण्यामध्ये मोलाचे योगदान देत आहेत. त्यांनी केलेल्या राष्ट्रभाषेच्या सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
श्री. उमेश केळकर यांना मिळालेल्या राष्ट्रभाषा प्रचारक पुरस्काराबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव वाघमारे यांनी अभिनंदन केले, तसेच पर्वेक्षक श्री. नितिन मोरे यांनी देखिल अभिनंदन केले, तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. सुनिल ऊर्फ (बंधु )मयेकर, उपाध्यक्ष श्री. विवेक परकर, सचिव श्री. विनायक राऊत व सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री. उमेश केळकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.