(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील संविधान आहे तसेच या मध्ये स्वातंत्र्य, समता ,बंधुता, न्याय या मूलभूत तत्वांचा अंतर्भाव केलेला आहे तर त्याचा प्रभावी वापर करणे हे सक्षम राज्यकर्ते यांच्यावर अवलंबून आहे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री प्रतिक यादव यांनी मांडले. तसेच भारतीय संविधानातील कलमे, परिशिष्ट तसेच मूलभूत हक्क व कर्तव्य यांची माहिती आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित विध्यार्थ्यांना करून दिली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नामदेव वाघमारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती साठी किती मोलाचे योगदान दिले व अपार मेहनत करून संविधानाची निर्मिती केली हे आवर्जून सांगितले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती साठी दिलेले योगदान कायमच प्रत्येक भारतीयाच्या लक्षात राहावे या साठी संविधान दिन साजरा केला जातो हे सांगितले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद सुर्वे यांनी केले तर आभार श्री अमित जाधव यांनी मानले.