(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय आणि मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मध्ये आधुनिक मराठी कवितेचे जनक कविश्रेष्ठ कृष्णाजी केशव दामले”केशवसुत”यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नामदेव वाघमारे यांनी कवी केशवसुत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केले व कार्यक्रमाची सुरुवात केली.
कवि केशवसुत यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेच्या वतीने काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, प्रशालेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केशवसुत यांच्या कवितांचे वाचन केले, व त्यांना अभिवादन केले. कर्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री सुशांत लाकडे यांनी कवि केशवसुत यांचा जीवन परिचय व त्यांच्या कवितांचे वेगळेपण विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मिलिंद सुर्वे यांनी केले, सूत्रसंचालन सौ. नेत्रा मोहित यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री. नितीन मोरे यांनी केले.