(जाकादेवी/ संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीची पाच वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये चेअरमन म्हणून सुनिल मुरारी मयेकर, व्हा.चेअरमनपदी- विवेक सदानंद परकर, खजिनदार -संदीप बाबाराम कदम तर सेक्रेटरी पदावर विनायक तुकाराम राऊत यांची निवड करण्यात आली.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीची कार्यकारी मंडळात शिक्षण संस्थेवर चेअरमन पदावर कार्यरत असलेले , शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ धडाडीचे-उपक्रमशील-अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्त्व सुनिल उर्फ बंधू मयेकर यांची पुन्हा एकदा चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.
शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून यापूर्वी शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत असलेले विवेक सदानंद परकर यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरी पदावर विनायक तुकाराम राऊत तर खजिनदार म्हणून संदीप बाबाराम कदम यांची या पदांवर फेरनिवड करण्यात आली. याशिवाय सहसचिव म्हणून श्रीकांत वसंत मेहेंदळे यांची नियुक्ती करण्यात आली.
मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय येथे आयोजित शिक्षण संस्थेच्या सभेत ही निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीचे मालगुंड एज्युकेशन सोसायटी, सोसायटीच्या विविध शैक्षणिक शाखा, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक, मित्र मंडळ, हितचिंतक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.