(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील व सध्या रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले माजी विद्यार्थी श्री विजय महादेव सुर्वे यांनी मालगुंड एज्युकेशन सोसायटीला सुमारे १लाख रुपयांची देणगी आपल्या आईच्या स्मरणार्थ दिली. श्री विजय महादेव सुर्वे यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मध्ये पूर्ण केले. रत्नागिरी येथे नाईक कंपनी मध्ये ते अकाऊंट म्हणुन कार्यरत होते व काही दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले.
त्यांचा मनात विचार आला की, आज मला जे काही मिळाले आहे ते माझ्या शाळेमुळे, ज्या शाळेमुळे ज्या संस्थेमुळे मी शिकलो नोकरीला लागलो ते ऋण कधीही न संपणारे आहे. शाळेच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी शाळेला देणगी दिली. शाळेच्या जडणघडणीमध्ये एक माजी विद्यार्थी म्हणून आपले सुद्धा योगदान असावे यासाठी त्यांनी ही देणगी संस्थेला दिली. यावेळी माजी विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले की, तुम्ही सुद्धा शाळेला संस्थेला आपल्या परीने मदत करा. या देणगी प्रीत्यर्थ मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातच त्यांनी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्याकडे १लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री विनायक राऊत, खजिनदार श्री संदीप कदम, संचालक व पंचायत समितीचे सदस्य श्री गाजजन उर्फ आबा पाटील, संचालक श्री माधव घनवटकर, निमंत्रित संचालक श्री श्रीकांत मेहंदळे, श्री दिवाकर पवार, श्री विजय महादेव सुर्वे यांचे मोठे बंधू श्री प्रकाश सुर्वे, व त्यांचे कुटुंबीय, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नामदेव वाघमारे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमित जाधव यांनी केले, तर आभार श्री बाबासो बेडक्याळे यांनी मानले.