(मुंबई)
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मार्फ केलेला एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संतप्त शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल करणा-या कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करण्यात आलेला कार्यकर्ता काँग्रेसचा असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित व्हिडीओ मातोश्रीवरून व्हायरल करण्यास सांगण्यात आले. तेव्हा आमदार, खासदार आणि नेते हे व्हायरल करत होते, असा गंभीर आरोप शितल म्हात्रे यांनी केला. शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत या व्हिडीओ प्रकरणात गंभीर आरोप केले.
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मार्फ केलेला एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते. या रॅलीतला एक व्हिडीओ कुणी तरी मार्फ केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.