संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे अनिष्ट विधवा प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीराम हनुमान ग्रामस्थ मंडळ फेपडे वाडी यांनी २९ मार्च हा ऐतिहासिक निर्णय घेत जिल्ह्यात एक आदर्श घालून दिला आहे.
श्रीराम जन्मोत्सवाच्या उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या विधवा प्रथा निर्मुलनाच्या विषयान्वे आंबेड बु. ग्रामपंचायतने केलेल्या ठरावानूसार फेपडे वाडी ग्रामस्थ मंडळाने बहुमताने विधवा प्रथा निर्मुलन करण्याचे ठरविण्यात आले. त्याचा कृतिशील कार्यक्रमाने सुरवात करण्यासाठी बुधवार दि. २९/०३/२०२३ रोजी श्रीराम मंदिरच्या रंगभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. युयुत्सु आर्ते l आणि सामाजिक कार्यकर्त्या मा. साै. वैदेही सावंत व सरपंच मा. श्री सुहासजी मांयगडे, उपसरपंच मा. श्री. भाटकर साहेब, पोलिस पाटिल श्री सुनिलजी शिगवण, वाडिप्रमुख मा. श्री. गणपत फेपडे, वाडिप्रमुख मा. श्री. गणुजी फेपडे, मुंबई मंडळाचे अध्यक्षच मा. श्री विश्वनाथजी फेपडे आणि उपाध्यक्ष मा. श्री. तुकारामजी फेपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला.
पतिच्या निधनानंतर कोणतेही अलंकार न उतरवणे, सद्यपरिस्थितीत असणार्या विधवा महिलांना यापुढे परिपुर्णा या नावाने संबोधने, कोणत्याही सार्वजनिक किंवा व्ययक्तिक कार्यक्रमात दुजाभाव न करता हळदीकुंकू करणे याबाबतची प्रतिज्ञा उपस्थित सर्व महिलांना मा. साै. वैदेही सावंत यांनी दिल्यानंतर या सर्व विधवांना सन्मानपूर्वक हळदि कुंकू लावण्यात आले. यापुढे कोणतीही परिपूर्णा महिला कुंकू व अलंकार घालून सन्मानाने समाजात वावरू शकेल. पतिच्या निधनानंतर कोणतेही अलंकार उतरवले जाणार नाहीत निर्धार आजच्या प्रबोधन कार्यक्रमात फेपडे वाडीतील सर्व पुरुष आणि महिलांनी घेतला. अशा या आजच्या सोनेरी क्रांतिकारक दिवसाचा सर्व आबालवृद्धानी स्वागत केले आहे. या निर्णयाने सर्वच स्रियांचे मनोबल वाढल्याचे दिसून आले.
कार्यक्रमात प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व महामानवांना पुष्पहार घालून मानवंदना करण्यात आली. संपुर्ण कार्यक्रमाचे निवेदन श्री नथुराम पाचकले यानी केले, प्रास्तविक श्री दिपक फेपडे केले तर श्री सुनिल शिगवण यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वि होण्यासाठी श्री हरिश्चंद्र फेपडे व ट्रस्ट चे सदस्य कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.