(संगमेश्वर/प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडी येथे रविवार दि. 10 एप्रिल रोजी रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये संगमेश्वरचे नाव रोशन करणाऱ्या कोळंबे येथील अक्षय पडवळचा सत्कार करण्यात येणार आहे.
रविवार 10 एप्रिल रोजी दु. १२.०० वा. हरिनाम समाप्ती व श्रीराम जन्म सोहळा, दु. १२.३० वा. श्रीराम मंदिर ते हनुमान मंदिर पालखी प्रदक्षिणा, दु. ०१.३० वा. महाप्रसाद, दु. ०३.०० वा. हळदीकुंकू व सत्कार समारंभ, सायं. ०७.०० वा. भजन संध्या, रात्री ०८.३० वा. विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रम होणार आहेत.
रात्री १०.०० वा. नवतरुण विकास मंडळ मुंबई यांनी निर्मित केलेलं तसेच अरविंद रूणकर यांनी लिहिलेलं व शाहीर नितीन रसाळ यांनी दिग्दर्शित केलेलं ‘तूच माझा पाठीराखा’ हे दोन अंकी हृदयस्पर्शी नाटक होणार आहे. या नाटकाच कथानक हे स्वार्थी जगात…सत्याच्या वाटेवरून चालताना संकटाना, अडअडचणींना सामोरं जाणाऱ्या, संघर्षाची लढाई करत आपल्या बहिणीच्या रक्षणार्थ सर्वस्व पणाला लावणाऱ्या, भावाच्या जीवनावर आधारित, एक ज्वलंत…. ह्रदयस्पर्शी नाटक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या नाटकाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष- सुमंत फेपडे, सचिव- गणू फेपडे, कार्यवाहक – दिपक फेपडे, प्रकाश खापरे, विश्वनाथ फेपडे, तुकाराम फेपडे यांनी केले आहे.